कर्जमाफी करण्यास राज्य सरकार असमर्थ; रावसाहेब दानवेंच्या भूमीकेने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

rsz_danve

जोपर्यंत शेतीमध्ये शाश्वत गुंतवणूक होणार नाही तो पर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात असमर्थ असल्याची भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केली. ते लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात गारपीटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर बोलत होते. गारपीटीमुळे नुकसान झालेल्याना भरघोस मदत देण्याचे आश्वासनही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलंय.

लातूर जिल्ह्यातील ७० गावात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. औसा तालुक्यात सर्वाधिक गावांना याचा फटका बसलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्याचे कामगारमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज औसा तालुक्यातील येल्लोरी आणि वरवडा या गावांना भेट देऊन पाहणी केली. येल्लोरी गावातील शेती तर पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. हरभरा, गहू, ज्वारी, मका सहित, भाजीपाला पीक, डाळिंब-द्राक्ष बागा गारपिटीनंतर नेस्तनाबूत झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यावर आलेल्या या संकटातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केलंय. तर जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी भरघोस मदत शेतकऱ्यांना मिळवून देऊ असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केलंय.

image_print
Total Views : 303

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड