आजपासून दोनशेची नवी नोट येणार; पाहा कशी आहे नोट…

RBI, Rs 200 note,Mumbai,

मुंबई: दोनशे रुपये मूल्याची नोट आजपासून (ता.25) चलनात येणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. दोनशेच्या नोटेमुळे बाजारातील तरलता वाढणार असून 100 रुपयांच्या .नोटे भार कमी होण्यास मदत होणार आहे. नोटाबंदीनंतर दोन हजार व पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने दोनशेशी नोट चलनात आणणार असल्याची घोषणा केली होती. दोनशेप्रमाणे 50 रुपयांची देखील नवीन नोट चलनात येणार आहे.

कशी आहे दोनशेची नोट:
महात्मा गांधी यांची छबी असलेल्या चलनी नोटांची नवी सिरीज पिवळ्या चकाकीयुक्‍त रंगात तयार करण्यात आली आहे. या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. दोनशेच्या नोटेच्या मागीलबाजूस अशोक स्तंभाची आकृती आहे आणि मुद्रण वर्ष 2017 लिहिण्यात आले आहे. याचबरोबर ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा लोगो यावर असणार आहे.

नवीन नोटा चलनात आल्यानंतर देखील दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट काही प्रमाणात सापडत आहे. त्यावर इलाज म्हणून आता लहान मूल्याची म्हणजेच 200 रुपयांची नोट चलनात आणली आहे. आरबीआयकडून दोनशेच्या 50 कोटी नोटा चलनात आणल्या जाणार आहेत.

दोन हजाराची नोट चलनात आल्यानंतर त्याचे सुटे पैसे देण्यासाठी समस्या निर्माण होत असल्याने लहान पाचशेपेक्षा लहान मूल्याची नोट नोटेची मागणी सर्वच स्तरांतून केली जात होती. कारण सध्या 100 आणि 500 मूल्याच्या नोटेदरम्यान कोणत्याही मूल्याची नोट उपलब्ध नव्हती. त्यावर सकारात्मक विचार करून, दोनशे रुपयांची नोट चलनात आणली जात आहे. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी दोनशेची नोट बाजारात आणण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. दोनशेची नोट चलनात आल्यानंतर रोखीचे व्यवहार देखील सुलभ होतील. शिवाय एकूण चलनातील कमी मूल्याच्या नोटांची संख्या वाढेल.

image_print
Total Views : 696

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड