पुण्यातील 'बालगंधर्व' रंगमंदिराचे पुनर्निर्माण

पुण्यातील 'बालगंधर्व' रंगमंदिराचे पुनर्निर्माण

पुणे : शहराचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे पुणे महानगरपालिकेने निश्चित केले असून, त्यासाठी महानगरपालिकेने 21 जानेवारीपर्यंत वास्तुविशारदांकडून जाहिरातीद्वारे आराखड्याचे प्रस्ताव मागविले आहेत. तसेच त्यासाठी लागणारी माहितीही महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. 

रगमंदिराची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नव्याने प्रचलित डी. सी. रूलनुसार नाट्यगृहाची नवीन इमारत बांधण्यात येईल. तसेच सध्यची इमारत कायम ठेवून सध्याच्या अस्तित्वातील नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा उर्वरित क्षेत्रावर नव्याने परिपूर्ण अशा रंगमंदिराच्या निर्मितीचे डिझाईन सादर करण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने वास्तूविशारदांकडून मागविला आहे. या दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारचे डिझाईन वास्तूविशारद देऊ शकतात. यासाठी लागणारी आवश्यक माहिती महानगरपालिकेकडून पुरवण्यात येईल.  

सध्याच्या रंगमंदिराचे उद्घाटन हे 26 जून 1968 मध्ये तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. रंगमंदिराची आसन क्षमता इतकी 989 आहे. तसेच या रंगमंदिरात एक कलादालनही आहे. रंगमंदिराच्या आवारात आता मेट्रोचे स्टेशन ही होणार आहे. त्यामुळे सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर लवकरच इतिहासजमा होणार आहे. पुणे महानगरपालिकेने बालगंधर्वचे पुनर्निर्माण हे नवीन तरतुदीनुसार काळानुरूप करण्याचे योजिले आहे. 

Web Title: Rebuilding of Balgandharva Rangamandir Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com