VIDEO: अंबाबाईसाठीच्या सुवर्णपालखीची विधीवत पूजा

Kolhpaur, Aai Ambabai, Gold Palanquin, Karveer Nivasini, Mahalaxmi Temple Koplhapur

करवीरनिवासिनी अंबाबाई देवीसाठी तयार करण्यात आलेल्या सोन्याच्या पालखीची आज कोल्हापूरमध्ये विधीवत पुजा करण्यात आली.साडेबावीस किलो वजन असलेल्या या सुवर्णपालखीचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरु होतं.खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारानं महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता.त्यानंतर भाविकांना सोनं दान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.आणि आता अखेर ही सुवर्णपालखी तयार झालीय.आज सकाळी अंबाबाईच्या मंदिरामध्ये ही पालखी आणण्यात आली.त्यानंतर विधीवत पालखीचं शुद्धीकरण आणि होमहवनही करण्यात आलं. त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती वाजतगाजत आणल्यावर या मूर्तीची प्रतिष्ठापना या पालखीत करण्यात आली.हा क्षण पाहण्यासाठी आज मंदिरामध्ये भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.पुढच्या महिन्यामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करुन ही पालखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं सूपूर्द केली जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिलीय.

image_print
Total Views : 330

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड