भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेेंचे जालन्यातील कार्यालय चोरट्यांनी फोडले.

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जालना : भोकरदन नाका परिसरातील सकलेचानगर येथील भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे मोरेश्वर सप्लायर्स हे खासगी कार्यालय शनिवारी (ता.आठ) चोरट्यांनी फोडले. कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकला मारहाण करुण कार्यालयातील फायली अस्तवेस्त करीत, सीसीटीव्ही कॉमेऱ्याची तोडफोड चोरट्यांनी केली.

सकलेचानगर येथील भाजप प्रदेशाध्यक्ष  खासदार रावसाहेब दानवे यांच्या मोरेश्वर सप्लायर्सचे खासगी कार्यालय आहे. शनिवारी (ता. आठ) पहाटे साडेतीन वाजन्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकास मारहाण करीत कार्यालयाच्या खिडकीतुन दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान चोरट्यांनी कार्यालयाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॉमेरा विरोध दिशेला फिरवला तर कार्यालयातील सीसीटीव्ही कॉमेरा चोरट्यांनी फोडला. चोरट्यांनी कार्यालयातील फायली अस्तवेस्त केल्या. दरम्यान कार्यालयातुन काहीही चोरीला गेले नाही, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक,  फिंगर प्रिंट तज्ज्ञांसह अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दालाचे पोलिस निरीक्षक यशवंत  जाधव, सदर बाजारचे पोलिस निरीक्षक  महादेव राऊत यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी भेट देऊन पंचमना केला.

Web Title: robbery in Raosaheb Danve office in Jalna

संबंधित बातम्या

Saam TV Live