संजय राऊत यांच्या ‘या’ थेट दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा..

Hindu Nation, Mumbai, Mohan Bhagwat, Shivsena, Sanjay Raut, Uddhav Thackeray

पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात हव्या असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. काही दिवसांपुर्वी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात एक भेट झाली होती. त्यानंतर शरद पवार यांच्याशी झालेल्या गप्पांदरम्यान पवारांनीच याबद्दलची माहिती आपल्याला दिली असल्याचा दावा संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरातून केलाय. राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार या निव्वळ अफवा असल्याच देखील पवारांनी आवर्जून म्हटल्याचं राऊत यांनी सदरात नमूद केलंय. तसंच सामन्याच्या सदरावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी काही प्रतिक्रिया दिली नाहीय. दरम्यान संजय राऊत यांच्या या थेट दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली.

image_print
Total Views : 4028

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड