शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटलांची परिवर्तनाची मिसळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

सातारा : साताऱ्यातून लोकसभेसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार असलेले नरेंद्र पाटील हे माझे मित्र असून, मित्राला शुभेच्छा देणे गरजेचे आहे. नाश्ता करायला आलो म्हणून पक्षश्रेष्ठी नाराज होण्याचे कामच नाही. सध्या माझे एकच काम आहे, टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात भाजपकडून नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंविरोधात उमेदवारीसाठी मागणी करणारे उमेदवार नरेंद्र पाटील यांना घेऊन आमदार शिवेंद्रराजे यांनी आज (शनिवार) सातारा येथील चंद्रविलास येथील फेमस मिसळ खाण्याचा बेत आखला होता. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील द्वंद्व सर्वांना माहिती आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे कोणाला मदत करणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की नरेंद्र पाटील माझे मित्र आहेत. आम्ही आमदार म्हणून एकत्र काम केले आहे. आघाडीच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा मला मदत केली आहे. माथाडी कामगारांसाठी काम केले आहे. यात्रेसाठी आले असताना त्यांनी मुक्काम केला होता. मी त्यांना नाश्तासाठी मिसळ खाण्याची आमंत्रण दिले. टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं, एवढेच मी सध्या करतो.

Web Title: Satara MLA ShivendraSinghraje Bhosale meet Narendra Patil in Satara

संबंधित बातम्या

Saam TV Live