तवांगजवळ हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; 7 मृत

Mi17 v 5,Helicopter crash,Arunachal Pradesh,Indian Airforce,Indian Army,

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 जातीचे एक हेलिकॉप्टर आज (शुक्रवार) सकाळी अरुणाचल प्रदेशमधील तवांगजवळ कोसळून झालेल्या अपघातामध्ये सात जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

या अपघातात भारतीय हवाई दलाचे पाच, तर लष्‍कराचे दोन जवान ठार झाले आहेत.या अपघात स्थळापासून चीनची सीमारेषाही जवळच आहे. एमआय – 17 व्ही 5 जातीचे हे हेलिकॉप्टर लष्करी वाहतुकीसाठी वापरण्यात येते. जगातील अत्याधुनिक हेलिकॉप्टर्समध्ये या हेलिकॉप्टरची गणना करण्यात येते.

या अपघाताची चौकशी तातडीने सुरु करण्यात आली आहे.

image_print
Total Views : 648

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड