आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही-पवारांचा फडणवीसांना टोला

आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही-पवारांचा फडणवीसांना टोला

मुंबई  : "काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गमंत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने...स्वकर्तृत्वाने चालवणारे लोक आहोत,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक विधानावर टोला लगावला. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात नाशिकमधील हिरे कुटुंबीयांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.  "आम्हाला माहीत होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही. आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्‍यकता नाही. आपला खराखुरा बाप शेतकरी आहे. शेतकरी हाच आपला खरा घटक आहे. त्याच्या मदतीने पुढे जावूया,'' अशा शब्दांतही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता हल्ला चढवला. 

माजी आमदार प्रशांत हिरे व अपूर्व हिरे यांचे शरद पवार यांनी पक्षात स्वागत केले. सोबत नाशिकच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुकही केले. भाऊसाहेब हिरे यांचे नाशिकसाठी असलेल्या योगदानाबाबतही त्यांनी भाष्य केले. नाशिकच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. फळबागायतीमध्ये क्रांती केलेला हा नाशिक जिल्हा असल्याचे गौरवोद्‌गारही पवार यांनी या वेळी काढले. 

"हिरे कुटुंबीयांची विचारधारा चांगली आहे. ते दुसऱ्या पक्षात गेले तो अपघात होता. त्या अपघातातून सावरून त्यांनी त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे. भुजबळांना बळ देण्यासाठी हे दोन तरुण आता उभे ठाकले असून, आता सगळ्या क्षेत्रांत नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनीच कामाला लागा, आमची साथ कायम राहील,'' असे आश्‍वासन पवार यांनी दिले. 

या वेळी पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री प्रशांत हिरे आणि आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही विचार व्यक्त केले. 

राष्ट्रवादीची ताकद वाढणार 
माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांचे पक्षात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे नाशिकसह दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे, असे ते म्हणाले. संकटामध्ये जसे विठ्ठलाचे नाव आठवते तसे दुष्काळातील संकटामध्ये शरद पवारांचे नाव देशातील शेतकऱ्यांना आठवते, असे सांगतानाच नाशिक जिल्हा शरद पवारांवर प्रेम करणारा असून, येत्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध करून दाखवू, असे आश्‍वासन आमदार छगन भुजबळ यांनी या वेळी दिले. 

Web Title: Sharad Pawar criticize Devendra Fadnavis on BJP politics

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com