भाजपसाठी शिवसेना "इन` आणि राणे "आऊट ?

भाजपसाठी शिवसेना "इन` आणि राणे "आऊट ?

मुंबई : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप आणि शिवसेनेत कमालीचा दुरावा झाल्यानंतर शिवसेनेला कोकणात शह देण्यासाठी भाजपने राणे यांना आपल्या गोटात ओढले होते. कॉंग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्‌यायला लावून राणे यांना राज्यसभेवर नेण्यात भाजपने मोलाचा वाटा उचलला होता. पण आता भाजप व शिवसेनेत चार वर्षाच्या कटूतेनंतर पुन्हा दिलजमाई झाली आहे. त्यामुळे, युतीत पुन्हा शिवसेना "इन' होत असेल तर शिवसेनेचे कट्‌टर विरोधक राणे भाजप आघाडीतून "आऊट' होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.
 
राणे यांच्यापेक्षा भाजपला शिवसेनेचाच अधिक आधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपच्या या राजकीय कुटनितीच्या जाळ्यात अडकलेल्या राणे यांनी पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची वाट धरण्याचे संकेत दिले आहेत. आज शरद पवार यांनी राणे यांची त्यांच्या गावी जावून भेट घेतली. त्यापुर्वी काही दिवसांपासूनच राणे हे राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याची जोरदार चर्चा होती. कॉंग्रेसमधे परतण्याची राणे यांची इच्छा नाही. पण, त्यावर सुवर्णमध्य काढण्यात माहीर असलेल्य पवार यांनी राणे यांना राष्ट्रवादीच्या सोबत येण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांचे मत आहे. राणे यांच्यामुळे रत्नागिरी - सिंधुदूर्ग या लोकसभेसह इतर चार विधानसभा मतदारसंघावर राजकीय समीकरणे बदलू शकतात अशी अटकळ बांधली जात आहे.
 
सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात शिवसेना भाजपने जल्लोष सुरू केला आहे. त्याला प्रत्यूत्तर म्हणून मराठा आरक्षणाचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या नारायण राणे यांना आघाडीत घेण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मराठा समाजात नारायण राणे यांच्याबद्‌दल सहानुभूती आहे. पहिल्यांदा आरक्षणाचा निर्णय घेण्यात राणे यांच्या समितीचे सर्वाधिक योगदान होते हे मराठा समाज नाकारत नाही. अशा राजकीय स्थितीत राणे आघाडीत सामिल झाले तर कोकणात नवी राजकीय समिकरणे दिसतील असा दावा केला जात आहे.

Webtitle: Shiv Sena "IN" and Rane "out" for BJP! After the visit of Pawar and Rane, the equations will change..

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com