आज शिवसेनेचा 51वा वर्धापनदिन, मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष

Uddhav Thackeray, Shivsena Foundation Day, Mumbai, Aditya Thackeray, Amit shah

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या गोटात शांतता असून एकाही नेत्याने माध्यमांशी संवाद साधला नाही. माध्यमांशी कोणीही बोलू नये, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. शिवसेना नरमली असल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे असले तरी ठाकरे पक्षनेत्यांशी चर्चा करतील. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात असून तिथे ते आपली भूमिका जाहीर करून भाजपला ‘मराठी बाणा’ दाखवितील, असं शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणारंय.

image_print
Total Views : 175

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड