Loksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार!

Loksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेनेही उमेदवार यादी जारी केली. यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 21 जणांचा उमेदवारी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातून लोकसभा उमेदवारी मिळालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावे :

1) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
4) ठाणे- राजन विचारे
5) कल्याण- श्रीकांत शिंदे
6) कोल्हापूर- संजय मंडलिक
7) हातकणंगले- धैर्यशील माने
8) नाशिक- हेमंत गोडसे
9) शिर्डी- सदाशिव लोखंडे
10) शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
11) संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
12) बुलढाणा- प्रतापराव जाधव
13) रामटेक- कृपाल तुमाणे
14) अमरावती- आनंदराव अडसूळ
15) परभणी- संजय जाधव
16) मावळ- श्रीरंग बारणे
17) धाराशिव  – ओमराजे निंबाळकर
18) हिंगोली - हेमंत पाटील 
19) यवतमाळ - भावना गवळी 
20) रायगढ़ - अनंत गीते 
21) सिंधुदुर्ग रत्नागिरी - विनायक राऊत

महाराष्ट्रातून लोकसभा उमेदवारी मिळालेल्या भाजपच्या उमेदवारांची यादी :

नंदूरबार - डॉ. हिना गावीत
धुळे - डॉ. सुभाष भामरे
रावेर - रक्षा खडसे
नागपूर - नितीन गडकरी
वर्धा - रामदास तडस
गडचिरोली - अशोक नेते
अकोला - संजय धोत्रे
चंद्रपूर - हंसराज अहिर
भिवंडी - कपिल पाटील
जालना - रावसाहेब दानवे
उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन 
नगर - सुजय विखे पाटील
बीड - प्रीतम मुंडे
लातूर - सुधाकरराव श्रृंगारे
सांगली - संजय पाटील.

Web Title: Shivsena BJP Alliance Candidate List for Loksabha Election

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com