'मातोश्री'वर जाण्यात कमीपणा काय?: देवेंद्र फडणवीस

'मातोश्री'वर जाण्यात कमीपणा काय?: देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेना-भाजपचे काही मुद्यावर निश्‍चितपणे मतभेद आहेत. त्यामध्ये गैर काही नाही. वेळ आल्यास मी मातोश्रीवरही जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली. 

राज्य सरकारला येत्या 31 ऑक्‍टोबरला चार वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्‍वभूमी मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष मुलाखत सामचे संपादक निलेश खरे यांनी घेतली. यावेळी फडणवीस यांनी विविध मुद्याना स्पर्श केला. 

मुख्यमंत्री म्हणाले, "राजकारणात जादू चालत नाही तर वस्तुस्थिती चालते. प्रत्येक पक्षाला अस्तित्व महत्त्वाचे असते. काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. आमचे दोन उमेदवार लढले तर गोंधळ होऊ शकतो. विभाजनामुळे शिवसेना-भाजपचे नुकसान होऊ शकते. काही मुद्‌द्‌यावर शिवसेनेशी मतभेद आहेत. शिवसेना मतभेदावर बोलते. राज्य एकमेकांवर चालले आहे.'' 

शिवसेनेचा नेहमीच आग्रह असतो मातोश्रीवर येण्याचा? या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, की मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय? मातोश्रीवर गेल्यामुळे पत्रकार वेगळा अंदाज काढतात. मात्र मातोश्रीवर गेले की तेथे गप्पा होतात, जेवण होते. मातोश्री हे काय जेल आहे. यापुढेही मातोश्रीवर जर जावे लागले तर मी तेथे जाईन, कमीपणा नाही. 

वेगळ्या विदर्भ मुद्यावर गलत करण्याची गरज नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले, की देशात छोटी राज्य झाली पाहिजेत हे भाजप सातत्याने सांगत आहे. त्यामुळे आमचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे. शिवसेनेचा त्याला विरोध आहे. तो असू शकतो. 

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे :
- अरबी समुद्रात ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे त्याच ठिकाणी हे स्मारक उभारले जाईल.
- काही राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्याच्या पत्नीला लक्ष्य करण्यासाठी टिम तयार केल्या आहेत
- आमच्या सरकारने शिवस्मारकासाठी लागणाऱ्या परवानग्या आणल्या, आता स्मारक होत आहे तर काहींना पोटशूळ उठत आहे.
- एखादा अपघात झाला म्हणून स्मारकाची जागा बदलण्याची गरज नाही, हा अपघात दुर्देवी आहे याबद्दल शंका नाही पण स्मारकाची जागा बदलण्याची गरज नाही.
- पुतळ्याची उंची आणि चबुतऱ्याची उंची याबद्दलही गैरसमज पसरवण्याचे काम विरोधकांनी केले.
- राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com