राज्य सरकारची स्वस्त तूरडाळीची चढ्या भावाने बाजारात विक्री; सरकारी डाळ पळवतंय कोण ?

राज्य सरकारची स्वस्त तूरडाळीची चढ्या भावाने बाजारात विक्री; सरकारी डाळ पळवतंय कोण ?

राज्यातील विक्रमी तूर उत्पादनानंतर तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेली गैरव्यवहारांची मालिका आता तूर विक्रीपर्यंत पोचली आहे. 35 रुपये किलोने विक्री अपेक्षित असलेली शासकीय तूर, पिशव्या फाडून खुल्या भावाने विकली जात असल्याचा संशय आहे.

शासकीय तुरीच्या रिकाम्या पिशव्यांचा ढीगच नवी मुंबईत सापडला आहे. यामागे तूरडाळीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पणन विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. तसंच सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तूरडाळीची अधिक विक्री व्हावी याकरता स्वस्त धान्य दुकानदारांकडून सर्वप्रथम 55 रुपये किलोप्रमाणे तूरडाळ विक्री करण्यात आली. मात्र महिन्याभरापूर्वी तूरडाळ विक्रीसंदर्भात शासनाने नवीन निर्णय जारी करत 35 रुपयांत तूरडाळ विक्रीस आणली.

गेल्या काळात आंदोलनं आणि संपाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तुरीच्या तुटवड्यामुळे, 70 रुपयांपर्यंत झालेल्या भाववाढीचा फायदा उचलण्यासाठी शासनाने कंत्राट दिलेले मिलर्स आणि पुरवठादारांनी संगनमताने शासकीय तूरडाळीची एक किलोची पाकिटे रिकामी करुन बाजारभावाने विकल्याचा संशय आहे. 

Youtube Link  : https://youtu.be/xKhbWUPLqaU

WebTitle : marathi news government pulses tur pulses maharashtra government warehouse 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com