#Yogi4PM योगींना आणा, देश वाचवा...

#Yogi4PM योगींना आणा, देश वाचवा...

लखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने हे पोस्टर लावले असून, "योगींना आणा, देश वाचवा' असा संदेश त्यावर लिहिला आहे. या संघटनेने पुढच्यावर्षी 19 फेब्रुवारी रोजी धर्म संसदेचे आयोजन केले आहे.

"योगी आणा, देश वाचवा' या संदेशाच्या बाजूला #Yogi4PM हा हॅशटॅग दिला आहे. या पोस्टरमधून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. मोदींना जुमलेबाज ठरवण्यात आले असून, योगी हिंदुत्वाचे "ब्रॅंड आयकॉन' असल्याचे म्हटल आहे. अमित जानी नावाच्या व्यक्तीने हे पोस्टर लावले आहेत.

योगींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले नाही तर हिंदू भाजपला मतदान करणार नाहीत, असा ठराव धर्म परिषदेत करण्यात येईल, असे अमित जानीने सांगितले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भर देऊन जोरदार प्रचार केला. मध्य प्रदेशातील एका सभेत योगींनी अली आणि बजरंग बली यापैकी एकाची निवड करा, असे मतदारांना आवाहन केले होते.
हिंदुत्व बाजूला ठेवून विकासाचा मुद्दा उचलून धरल्यामुळे भाजपचा पराभव झाला, असे काही समर्थकांचे मत आहे. त्यांनी सोशल मीडियावरून तशी आपली नाराजीही प्रगट केली. निवडणुकीत विजयासाठी विकास आवश्‍यक आहे; पण तितके पुरेसे नाही. विकासाचा अभाव हिंदुत्वाने भरून काढता येऊ शकतो, असे राज्यसभेतील भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले.

Web Title: marathi news politics lucknow demands yogi aadityanath as pm 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com