मुंब्र्यातून एका संशयित दहशतवाद्याला अटक

rsz_isis mumbra

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकासोबत केलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्र एटीएसनं मुंब्र्यातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केलीय. त्याशिवाय, जालंधर आणि बिजनौरमधूनही पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्यात. ते नेमके कोणत्या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत हे कळू शकलेलं नाही, पण देशात मोठा घातपात घडवण्याचा कट त्यांच्या अटकेमुळे उधळला गेलाय. वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे सदस्य देशाच्या विविध भागात सक्रिय असून त्यांच्यात काहीतरी शिजतंय, अशी ‘टिप’ उत्तर प्रदेश एटीएसला खबऱ्यांकडून मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे त्यांनी दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल, आंध्र प्रदेशचा क्राइम इन्वेस्टिगेशन सेल, महाराष्ट्र एटीएस, पंजाब पोलिस आणि बिहार पोलिस या सगळ्यांशी समन्वय साधला. गेला महिनाभर, आपापल्या राज्यांच्या कानाकोपऱ्यांत शोधमोहीम राबवल्यानंतर आज या पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यात मुंब्र्यातून 26 वर्षीय नाज़िम शमशाद अहमेद संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आलीय, तर दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं समजतं.

image_print
Total Views : 220

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड