राज्यात काल रात्रीपासून अनेक ठिकाणी ढगांच्या क़डकडाटासह पाऊस

rsz_paus

काल मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.. पडलेल्या पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात सुखावलंय तर उकाड्याने हैराण झालेले मुंबईकरही सुखावलेत.

लातूर शहरात काल रात्रीपासूनच पावसानं चांगलाच जोर धरला आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानमुळे शहरातील अनेक भागात विज गायब आहे. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. अनेक ठिकाणी नाले तुंबल्यानं पाणी साचलं आहे. तर शहरातील नाना नानी पार्कजवळ झाड कोसळल्यानं वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

राज्यात काल रात्रीपासून अनेक ठिकाणी ढगांच्या क़डकडाटासह पावसानं झोडपून काढलंय. सांगली साताऱ्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर कोल्हापूर शहरात रात्री मुसळधार पाऊस झाला. सलग दीड तास वीज वारयासह पाऊस सुरु होता. शहरातील विद्युत पुरवठाही काही काळ बंद होता. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठल होत.तर मुंबई आणि उपनगरातही पावसाचा जोर पाहायला मिळाला.. रत्नागिरीत मुसळधार पाऊस साखरपा ,रत्नागिरी ,देवरुख ,संगमेश्वर आदी भागात पावसाने झोडपले

image_print
Total Views : 763

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड