हजरत निजामुद्दीन दरगाहचे बेपत्ता झालेले मौलवी भारतात परतलेत

Indian clerics,missing, pakistan, indian, Sushma Swaraj

पाकिस्तानात बेपत्ता झालेले हजरत निजामुद्दीन दरगाहचे दोन मौलवी आज भारतात परतलेत. सकाळी दिल्ली विमानतळावर दोघा मोलवींचं कुटुंबियांनी स्वागत केलं. निजामुद्दीन दर्गाचे प्रमुख मौलवी सैय्यद आसिफ अली निजामी आणि त्यांचे पुतणे नाजिम अली निजामी 6 मार्च रोजी कराचीला गेले होते. पण, याच दरम्यान ते पाकिस्तानाच बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानसोबत त्यांच्याविषयी चर्चा केली. त्यानंतर हे दोन्ही मौलवी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान मौलवी सैय्यद आसिफ अली निजामी यांची बहिणी कराचीत राहते. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ते कराचीत गेले होते, अशी माहिती समोर आलीये.

image_print
Total Views : 163

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड