उत्तरप्रदेशातल्या २ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी

Yogi Adityanath, Uttar Pradesh,farm loan waiver, BJP

उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आलीय.योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.उत्तर प्रदेशातल्या एकूण 2 कोटी 15 लाख शेतकऱ्यांचं तब्बल 36 हजार 359 कोटींचं कर्ज माफ करण्यात आलंय.लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यात आला असून कर्जमाफीसाठी 1 लाखांची मर्यादा ठरवण्यात आलीय.पीक कर्जासाठी राष्ट्रीय किंवा इतर कुठल्याही सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जांचा यात समावेश आहे.यूपीतल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 92.5 टक्के शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचा दावा सरकारनं केलाय.

उत्तर प्रदेशात सत्तेवर आलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलीय.त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय.

आमचं सरकार सत्तेवर आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं आश्वासन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभांमध्ये दिलं होतं.

image_print
Total Views : 303

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड