उल्हासनगरमध्ये वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

burnt, Vadapav seller, Ulhasnagar,Mumbai

उल्हासनगरमध्ये काही अज्ञात लोकांनी एका वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील देवानंद फोटो स्टुडिओसमोर मुंबई महालक्ष्मी वडापावचं दुकान आहे. पूर्ववैमनस्यातून काही लोकांनी आज या दुकानाच्या मालकावर हल्ला केला आणि त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.

image_print
Total Views : 248

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड