व्यंकय्या नायडू यांनी घेतली देशाचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ

Venkaiah Naidu, broadcasting, new delhi

व्यंकय्या नायडू यांनी आज देशाचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नायडूंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. नायडू यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आज सकाळी दहा वाजता व्यंकय्या नायडू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्यापूर्वी नायडू यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प वाहून आदरांजली वाहिलीय. उपराष्ट्रपती बनण्यासोबतच व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे सभापती बनलेत. व्यंकय्या नायडूंनी आंध्र प्रदेशच्या नेल्लूरपासून नवी दिल्ली असा मोठा राजकीय प्रवास केलाय.

नायडूंनी आज देशाच्या दुसऱ्या मोठ्या घटनात्मक पदाची जबाबदारी स्वीकारलीय. दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी 14 खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे 785 पैकी 771 खासदारांनीच मतदान केलंय. एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांना 516 मतं मिळाली. तर त्यांचे विरोधी उमेदवार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांना केवळ 244 मतं मिळाली. व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेशातून उपराष्ट्रपती बनणारे तिसरे व्यक्ती आहेत. नायडूंच्या आधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्हीव्ही गिरी यांनी देखील देशाचं उपराष्ट्रपतीपद भूषवलंय.

image_print
Total Views : 134

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड