विनोद खन्ना रूग्णालयात दाखल

Vinod khanna, hospitalised, Mumbai, kokila ben hospital,Rahul Khanna

अभिनेते विनोद खन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.रविवारी रात्री त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या एका रुग्णालयात भरती करण्यात आलंय.सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती समोर येतंय.विनोद खन्ना यांना डिहायड्रेशनचा त्रास असल्यानं रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.मात्र आता प्रकृतीत सुधारणा झालीय.लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती राहुल खन्ना यांनी दिली.गुरुवारी विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक राणी ऐसी भी’ या सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा ठेवण्यात आला होता. बिग बी अमिताभ बच्चन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र प्रकृती बिघडल्याने विनोद खन्ना हजर राहू शकले नाहीत.

image_print
Total Views : 370

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड