कोल्हापूर बाजार समितीच्या हस्तक्षेपानंतर बंद गुळ साैदे पुन्हा सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कोल्हापूर - येथील बाजार समितीत तोलाईदारांनी काम करण्यास सलग दुसऱ्या दिवशीही नकार दिल्याने गुळ सौदे बंद पडले, त्यामुळे संतापलेल्या गुळ उत्पादकांनी शाहू मार्केट यार्डाची दोन्ही प्रवेशव्दारे बंद केली. यानंतर बाजार समितीने तोलाईदारांची समजूत काढून सौदे सुरू केले, पण काही वेळात एक दोन माथाडीनी काम करण्यास नकार दिला. तेव्हा व्यापारी अडते सौदे सोडून निघून गेले तसा वाद टोकला गेला. तेव्हा शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालय टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले. दुपारी दिड वाजे पर्यंत वाद घुमत राहीला अखेर बाजार समितीने हस्तक्षेप करीत गुळ सौदे पूर्ववत सुरू केले.

यासर्व प्रकारात शाहू मार्केट यार्डात गुळ उत्पादकांची पळापळी, व्यापारी माथाडी, बाजार समिती, यांच्यात जोरदार शाब्दीक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. अखेर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व घटकांची समजूत घातल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास बंद पडलेले गुळाचे सौदे पुन्हा सुरु झाले. 

तोलाईदारांनी शेतकऱ्यांकडून तोलाईची रक्कम घेवू नये, असे आदेश पणन विभागाने दिले आहेत. त्याला विरोध करण्यासाठी तोलाईदार व माथाडी कामगारांनी बुधवारी (ता.12) काम बंद आंदोलन केले होते. गुरूवारी सौदे पून्हा सुरू होतील अशा अपेक्षेने गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी गुळ शाहू मार्केट यार्डात आणला होता. 

त्यानुसार गुरुवारी सौद्याची तयारी सुरु असतानाच काही तोलाईदारानी काम करण्यास नकार दिल्याने सौदे बंद पडले. माथाडी कामगारांनी कामाच्या वेळाही वाढविण्याची मागणी केली. यामुळे गोंधळ वाढला. सौदे सुरु होण्यास वेळ होत असल्याने या ठिकाणी आलेले गुळ उत्पादक अस्वस्थ झाले. गुळाची निर्गत करण्याऐवजी हे घटकच भांडत बसल्याने जिल्ह्यातून आलेल्या गुळा उत्पादकांचा संताप अनावर झाला. 

तोलाईदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न 
प्रवेशव्दारावर गोंधळ सुरू असताना गल्लीनंबर सहामध्ये तोलाईदार एकत्र आले त्यांनी तिथे बैठक घेतली. येथे बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड, सचिव मोहन सालपे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी शेतकरी सर्व तुमच्या मागणीच्या बाजूने असतील पण गुळाचे सौदे बंद पाडून शेतकऱ्याचे नुकसान करु नका, सौदे तात्काळ सुरु करा असे आवाहन केले. व्यापारी व अडते हेही तिथेच थांबून होते.यावेळी तोलाईदारांनी मात्र आम्हाला कामच मिळणार नसेल तर आम्ही आंदोलन करायचे नाही का असा प्रतिप्रश्‍न केला. त्यावर बाजार समितीने सर्वच संबधीत घटकांची सोमवारी बैठक घेऊन मार्गाकाढून आता बाजारपेठेत गुळ आहे त्याचे सौदे सुरू होण्यासाठी तोलाईदारांनी काम सुरू करावे असे सचिव मोहन सालपे यांनी सांगितले. 

तोलाईदारांची सोमवारी बैठक घेऊ असे आश्‍वासन दिल्यानंतर सर्वच घटकांना सौदे स्थळी आणणेत आले. दुपारी दीडच्या सुमारास व्यापाऱ्यांना सौदे स्थळी आणले. अखेर एकच्या सुमारास सौद्यास सुरवात झाली. 

Web Title: jaggery deals close at Kolhapur

संबंधित बातम्या

Saam TV Live