एकीकडे शुकशुकाट तर दुसरीकडे जल्लोष

एकीकडे शुकशुकाट तर दुसरीकडे जल्लोष

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे जवळपास कल समोर येण्यास सुरवात झाली आहे. चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसकडून जोरदार धक्का मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पूर्ण वर्चस्व राखत भाजपची सत्ता हिसकावून घेतली.

यावेळी एकीकडे दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात शुकशुकाट दिसत आहे. सतत कार्यकर्त्यांचा जल्लोष असणाऱ्या भाजप कार्यालयात आज कमालीची शांतता दिसून येत आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या काँग्रेस कार्यालयात मात्र मोठा जल्लोष चालू असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यात सत्ताधारी भाजपला जोरदार दणका बसला आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या लढाईत प्रथमच राहुल यांची सरशी होताना दिसत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दीर्घ कालावधीपासून भाजपची सत्ता आहे. ही राज्ये यंदा काँग्रेसने खेचून घेतली आहेत, असे मतमोजणीच्या सुरवातीचे चित्र आहे.

Web Title: Rajasthan Chhatisgarh Madhya Pradesh Elections result Congress win

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com