Shravan Special Vrat Recipe 2023: श्रावणातल्या पहिल्या सोमवारी नैवेद्यात झटपट बनवा बटाट्याचा हलवा, पाहा रेसिपी

How To Make Potato Halwa : तुमचा ही उपवास असेल आणि नैवेद्यात काही झटपट पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करु शकता.
Shravan Special Vrat Recipe 2023
Shravan Special Vrat Recipe 2023Saam Tv

Batata Halwa Recipe :

श्रावण महिना म्हटलं की, अनेकांचा या दिवशी उपवास असतो. या दिवसात अनेक गोडाचे व उपवासाचे पदार्थ चवीने खाले जातात. शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा अर्चना करतात.

आज श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार. या दिवशी अनेकांचा उपवास असतो. उपवास असल्यामुळे बरेच लोक फळे व उपवासाचा पदार्थ चवीने खातात. जर तुमचा ही उपवास असेल आणि नैवेद्यात काही झटपट पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करु शकता.

Shravan Special Vrat Recipe 2023
Shravan Festival Recipes : तीज, नागपंचमी आणि रक्षाबंधनला ट्राय करा स्वीट डिश; रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटेल

1. साहित्य

  • 4 मोठे उकडलेले बटाटे (Potatoes)

  • देशी तूप

  • 1 कप साखर (Sugar)

  • 1 कप दूध

  • ¼ टीस्पून वेलची पावडर

  • 4 बारीक चिरलेले बदाम

  • 4 बारीक चिरलेले पिस्ते

  • 4 बारीक चिरलेले काजू आणि केशर

Shravan Special Vrat Recipe 2023
Shravan Recipe 2023 : श्रावणात नैवेद्यासाठी स्वीट डिश बनवायचा आहे? ट्राय करा पौष्टिक तिळाची खीर, पाहा रेसिपी

2. कृती

  • बटाट्याचा हलवा बनवण्यासाठी प्रथम बटाटे स्वच्छ धुवून उकडून घ्या

  • यानंतर, उकडलेले बटाटे मॅश करा किंवा किसून घ्या.

  • आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यात देशी तूप (Ghee) टाका.

Shravan Special Vrat Recipe 2023
Famous Travel Place In Vasai : मुंबईजवळच्या निसर्गात हरवून जायचंय; वसईतील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!
  • आता त्यात मॅश केलेले बटाटे घालून चांगले परतून घ्या.

  • भाजताना सतत ढवळत राहा आणि नंतर साखर घाला. साखर घातल्यावर तळून घ्या.

  • त्यानंतर यात दूध घाला. हवे असल्यास तुम्ही खवा देखील घालू शकता वरुन वेलची पूड व केशर टाकून नीट ढवळा.

  • मिश्रण घट्ट होऊ द्या. त्यानंतर यात बदाम, पिस्ता आणि काजू मिक्स करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com