वर्धा - आर्वी येथे आढळला पांढरा साप

 वर्धा - आर्वी येथे आढळला पांढरा साप

आर्वी (वर्धा) : येथील पिपला पुनर्वसन येथे दुर्मिळ प्रजातीचा पांढरा साप आढळल्यामुळे नागरिक अचंबित झाले व खळबळही उडाली. या पांढऱ्या नागाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हा दूर्मिळ साप राहुल ठाकरे (रा पिंपला पुनर्वसन) यांच्या घराच्या परिसरात आढळला. 

पांढरा नाग हा साप, नाग जातीचा आहे व तो विषारी व आतिशय  वेगळा आहे, या आधी असा नाग एकदा चंद्रपूर इथे सापडला होता. त्या  नंतर त्याची नोंद आर्वी शहरात झाली. आर्वी येथील पीपला पुनर्वसन येथील रहिवसी राहुल ठाकरे यांच्या कडे हा साप आढळला.  त्यांनी प्राणिमित्रांना याबाबत माहिती दिली व त्वरित घटनास्थळी येऊन प्राणीमित्रांनी या सापाला शिताफीने पकडले.

या नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. वन विभागाचे कर्मचारी कावले, सावंत, कुकडे आणि प्राणीमित्र तुषार साबळे शुभम जगताप, आकाश ठाकरे, रितेश कटेल, मोनू मुला, संकेत वनस्कर, सूरज विरपचे व गीते यांनी या सापाला सागरपुरी तलावात सोडले. हा दुर्लभ लिमुसिसटिक साप असुन विषारी आहे कारण एलबिनो जनावरांचे डोळे गुलाबी असतात असे प्राणीमित्र शुभम जगताप यांनी  सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com