चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरुन निर्घुणपणे खून

rsz_wife_murder

कसबा, सांगाव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरुन निर्घुणपणे खून केल्याची घटना कसबा सांगाव येथील आण्णाभाऊ साठे नगर परिसरात आज (सोमवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली.

वर्षा प्रल्हाद आवळे (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी पती प्रल्हाद रामचंद्र आवळे (वय 45) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगी ऋुतूजा प्रल्हाद आवळे (वय 16) हिने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

आरोपी प्रल्हाद सेंट्रींगचे काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. चारित्र्याच्या संशयावरुन वारंवार तो पत्नीशी भांडत होता. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास याच कारणावरुन त्याचे पत्नीशी भांडण झाले. संतप्त झालेल्या प्रल्हादने वर्षाच्या गळ्यावर आणि हनवटीवर विळ्याने वार करुन तिचा निर्घृण खून केला. घटनास्थळी कागल पोलिस निरिक्षक औदूंबर पाटील, उपनिरिक्षक श्रीगणेश कवितके यांनी भेट देवून पंचनामा केला. पोलिस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

image_print
Total Views : 154

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड