अन्‌ तिने विमानात दिला बाळास जन्म

New Delhi,Saudi Arabia, Jet Airways, new baby born, Kochi

नवी दिल्ली – सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात एका गरोदर महिलेने एका अपत्यास जन्म दिल्याची घटना घडली.

9 डब्ल्यू 569 या विमानाने आज पहाटे 2.55 वाजता येथून उड्डाण केले होते. या विमानातून एक गरोदर महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर याची कल्पना तिने विमानातील कर्मचाऱ्यांना दिली. हे विमान अरबी समुद्रावरून प्रवास करत असतानाच तिने एका बाळास जन्म दिला. या विमानातून एक परिचारिकाही प्रवास करत होती. तिने यासाठी मदत केली. नंतर या विमानाची दिशा बदलून ते मुंबईकडे आणण्यात आले. तेथे उतरताच सदर महिला व तिच्या नवजात बाळास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

image_print
Total Views : 216

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड