कर्जमाफी करेपर्यंत मोदींना झोपूही देणार नाही; राहुल गांधींचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही झोपू देणार नसल्याचा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही झोपू देणार नसल्याचा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाले आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने जाहीरनाम्यात केलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून कर्जमाफी देत असल्याचे आणि आश्वासन पाळल्याचे जाहीर केले आहे. आता त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना 2008 मध्ये देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती.

राहुल गांधी म्हणाले, ''सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे की देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कर्जमाफी द्यावी. आम्ही तोपर्यंत पंतप्रधानांना झोपूही देणार नाही. पंतप्रधानांनी आतापर्यंत एक रुपयाही कर्जमाफी दिलेली नाही. आम्ही नागरिकांना दहा दिवसांत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही तासांत कर्जमाफी देण्यात आली. राजस्थानमध्ये काम सुरु आहे.''

राफेलवरून चर्चा करण्यापासून सरकार पळत आहे. देशातील जनतेच्या पैशाची चोरी केली जात आहे. नोटाबंदी हा देशातील सर्वांत मोठा गैरव्यवहार होता. अनिल अंबानी यांच्यावर 45 हजार कोटींचे कर्ज आहे. या पैशात छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करता येऊ शकले असते, असेही राहुल गांधी म्हणाले.

Web Title: Wont let PM sleep till he waives farm loans says Congress President Rahul Gandhi


संबंधित बातम्या

Saam TV Live