पुणे-सोलापूर रेल्वेस्थानकाला 2 वर्षांचा अवधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

पुणे - हडपसर रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामाबद्दल पुणे आणि सोलापूर विभागातील खासदारांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाबद्दल नाराजी दर्शविली आहे. या स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात पुणे स्थानकावरील वाढता ताण कमी कसा होणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. 

पुणे - हडपसर रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामाबद्दल पुणे आणि सोलापूर विभागातील खासदारांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाबद्दल नाराजी दर्शविली आहे. या स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात पुणे स्थानकावरील वाढता ताण कमी कसा होणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. 

रेल्वे प्रशासनाने नुकत्याच घेतलेल्या बैठकीत हडपसर रेल्वे स्थानकाबाबत विस्तृत चर्चा झाली. पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या शिवाजीनगर स्थानकावरून तर, दौंडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या पुणे स्थानकावरून सोडण्यात याव्यात, असे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. त्यानुसार हडपसर रेल्वे स्थानकाचे काम सुमारे दीड वर्षांपासून सुरू आहे; परंतु ते धीम्या गतीने सुरू असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

हडपसर रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा मांडण्याची सूचना खासदार गिरीश बापट यांनी केल्यावर, हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यावर खासदारांनी नाराजी व्यक्त केली. हडपसर स्थानकासाठी सुमारे ५० कोटींची तरतूद झाली आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत लवकरच बैठक घेण्यात यावी, असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले. पुणे स्थानकावरील पार्किंगचा प्रश्‍न, प्रवाशांच्या तक्रारी यावरही बैठकीत चर्चा झाली. त्या बाबत ठोस आराखडा तयार करून कोंडी सोडविण्यास बापट यांनी सांगितले. पुणे विभागाकडून सुरू असलेल्या कामांची माहिती विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली. 

पुणे स्थानकावरील रोजची वाहतूक  

  रेल्वे गाड्या : सुमारे १७५
  लोकल :  ४२
  प्रवाशांची संख्या : सुमारे दोन लाख

पुणे, पिंपरी चिंचवड तसेच सातारा, कोल्हापूर, मिरज दरम्यानचे रेल्वे स्थानकापासून ते प्लॅटफॉर्मपर्यंतचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. ते मार्गी लागावेत, यासाठी पुणे विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- गिरीश बापट, खासदार

Web Title: The railway administration says wait two more years


संबंधित बातम्या

Saam TV Live