स्वाभिमानी'च्या आमदाराला मुख्यमंत्र्यांचे 5 तर 'मातोश्री'चे 4 कॉल!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

पुणे : "मी भाजपला पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वेळा फोन केला. मातोश्रीवरून चार कॉल आले. एक वेळा उद्धव ठाकरेनी पाठिंब्याबाबत विनंती केली मात्र मी राजू शेट्टी यांच्याशी गद्दारी करणार नाही आणि चळवळीला नख लावणार नाही, असे त्यांना सांगितल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

भुयार म्हणाले,"आम्ही या निवडणुकीकडे निवडणूक म्हणून बघत नव्हतो तर चळवळ म्हणून बघत होतो. लोकांच्या बळावर आम्ही राज्यातील चार नंबरच्या मंत्रीमहोदयांचा पराभव करू शकलो. आम्ही चळवळ उभा केली आणि आमचा विजय झाला. राजू शेट्टी यांच्या विचाराने मी काम करतोय. आम्ही त्यांचा चेहऱ्यावर मते मागितली आहेत. आम्ही शेतकऱ्यांशी बांधील आहोत आणि शेट्टीच्या विचाराचे पाईक आहोत म्हणून लोकांनी आम्हाला विजयी केले आहे."

"पाठिंबा दयावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वेळा फोन केला. सुभाष देसाई तीन वेळा बोलले तर उद्धव ठाकरे यांचेही बोलणे झाले. मात्र मी त्यांना "राजू शेट्टी यांच्याशी गद्दारी करणार नाही आणि चळवळीला नख लावणार नाही " असे सांगितल्याचे आमदार भुयार म्हणाले.  

Webtitle:: 5 calls to Chief Minister and 4 calls from 'Matoshree' to MLA Swabhimani!

संबंधित बातम्या

Saam TV Live