खासगी मोबाईल कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी(BSNL) सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम - 'मिशन राजीव' कॉंग्रेसने

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम '3 जी' सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने '4 जी' सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याची टीका 'मिशन राजीव' कॉंग्रेसने केली. बीएसएनएल च्या ग्राहकांसाठी तातडीने '4 जी' सेवा सुरू करावी या मागणीसाठी 'मिशन राजीव'च्या वतीने बाजीराव रस्त्यावरील 'बीएसएनएल' कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.

पुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम '3 जी' सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने '4 जी' सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याची टीका 'मिशन राजीव' कॉंग्रेसने केली. बीएसएनएल च्या ग्राहकांसाठी तातडीने '4 जी' सेवा सुरू करावी या मागणीसाठी 'मिशन राजीव'च्या वतीने बाजीराव रस्त्यावरील 'बीएसएनएल' कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी "मिशन राजीव'चे संस्थापक व कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक शिवा मंत्री, शहर कॉग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब मारणे, पीएमटी कामगार संघ इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आदी उपस्थित होते. 

डिजिटल इंडियात '4 जी' सेवा नाही 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा मोठा गवगवा केला परंतु, मागील चार वर्षांपासून बीएसएनएल या सरकारी कंपनीची 4जी सेवा ते सुरू करू शकले नाहीत. डिजिटल इंडिया ही सरकारी कंपन्यांसाठी नसून केवळ खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे का? असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. 

 

Web Title: BSNL was stuck on 3G in digital India


संबंधित बातम्या

Saam TV Live