इम्रान खान-ट्रम्प एकमेकांना  भेटणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

इस्लामाबाद: काही दिवसांच्या काळातच खान आणि ट्रम्प यांच्या दोन भेटी होणार आहेत.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट येत्या २३ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्कमध्ये आयोजित अधिवेशनादरम्यान ही भेट होऊ शकते, असा दावा पाकिस्तानच्या 'डॉन' या वृत्तपत्राने केला आहे. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पाकिस्तानचे काश्मीरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे म्हटले आहे.त्यातील एक अधिवेशनादरम्यानची असेल, असेही 'डॉन'ने विश्वसनीय सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यासमोर ह्युस्टनमध्ये होणाऱ्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी खान व ट्रम्प भेट होत आहे.

मोदी आणि खान हे दोघेही २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भाषण करतील. या अधिवेशनात आपण काश्मीरबाबतचा मुद्दा मांडणार असल्याचे खान यांनी सांगितले  इम्रान खान रविवारी, २१ सप्टेंबरला न्यूयॉर्कला पोहोचणार असून, त्या दिवशी ट्रम्प आणि मोदी 'हाउडी मोदी' कार्यक्रमात एकत्र असतील.

Web Title donald trump likely to meet imran khan on september 23

संबंधित बातम्या

Saam TV Live