चारित्र्याच्या संशयावरून अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 डिसेंबर 2018

चांदवड - तालुक्‍यातील राहूड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सोडविण्यास आलेल्या सासूलाही पतीने गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर पतीने स्वत:ही फाशी घेण्याचा प्रयत्न केला. घटनेतील गंभीर जखमी आई व मुलीवर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीस मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूड येथे बुधवारी (ता. 19) सकाळी सहाच्या सुमारास रत्नाबाई गुलाब वानखेडे (वय 40) पती गुलाब जिजाबा वानखेडे व आई लीलाबाई गंगाराम देवरे यांच्यासह घरात होत्या. मुलगा पंकज धावण्याच्या सरावासाठी बाहेर गेलेला होता. त्याच वेळी गुलाब पत्नी रत्नाबाई हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत लोखंडी गजाने तिच्या डोक्‍यावर व शरीरावर मारहाण करू लागला. गेल्या आठ दिवसांपासून मुलीकडे राहत असलेल्या सासूबाई लीलाबाई सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांनाही गुलाबने लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर पत्नी रत्नाबाई हिच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकून नंतर अंगावर रॉकेल व डिझेल टाकून पेटवून दिले. पत्नी रत्नाबाई पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर आली असता परिसरातील नागरिकांनी अंगावर कपडे टाकून आग विझविली व गंभीर जखमी झालेल्या रत्नाबाई व लीलाबाई यांना उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी दोघींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. 

दरम्यान, घटनेनंतर पती गुलाब याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न असफल झाल्यानंतर त्याने घरात फाशी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत चांदवड पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: husband kill wife in chandwad

संबंधित बातम्या

Saam TV Live