कोल्हापूर ते हैदराबाद, बंगळूर विमानसेवा रविवारपासून सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

कोल्हापूर - केंद्र सरकारच्या ‘उडान फेज टू’ या योजने अंतर्गत रविवार (ता. ९) पासून रोज कोल्हापूरहून हैदराबाद, बंगळूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यातून हैदराबाद-कोल्हापूर ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती; मात्र हवाई परवाना मिळाला नसल्यामुळं, तांत्रिक कारणामुळे त्याला विलंब झाला. त्यासाठी खासदार महाडिक यांनी दिल्ली इथे जाऊन नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन व्हीएफआर हा परवाना मिळावा, अशी मागणी केली. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी हा परवाना देण्यात आला.

कोल्हापूर - केंद्र सरकारच्या ‘उडान फेज टू’ या योजने अंतर्गत रविवार (ता. ९) पासून रोज कोल्हापूरहून हैदराबाद, बंगळूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यातून हैदराबाद-कोल्हापूर ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती; मात्र हवाई परवाना मिळाला नसल्यामुळं, तांत्रिक कारणामुळे त्याला विलंब झाला. त्यासाठी खासदार महाडिक यांनी दिल्ली इथे जाऊन नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन व्हीएफआर हा परवाना मिळावा, अशी मागणी केली. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी हा परवाना देण्यात आला. त्यामुळं एटीआर हे ७२ आसनी विमान कोल्हापुरातून टेकऑफ करण्याचा मार्ग मोकळा झाला.  

९ डिसेंबरपासून अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून सुरळीतपणे ही सेवा सुरू राहील, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. या हवाई सेवेसाठी ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यात्रा डॉट कॉम, मेक माय ट्रिप आणि एअर इंडिया डॉट इन या वेब पोर्टलवर बुकिंग करता येणार आहे. लवकरच कोल्हापूर-तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरू होईल. तसेच उडान फेज थ्रीसाठी हवाई मार्गनिश्‍चिती होणार आहे. 

Web Title: Kolhapur to Hyderabad, Bangalore aircrafts from Sunday


संबंधित बातम्या

Saam TV Live