काँग्रेस सरकारची शेतकऱ्यांसाठी मध्यप्रदेशात कर्जमाफीपाठोपाठ मोठी घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

भोपाळ : मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी दोन तासाच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेन्शनही देण्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांवर कमलनाथ यांनी सवलतींचा वर्षावच केला आहे.  मध्यप्रदेश हे कृषिप्रधान राज्य आहे. यापूर्वीच्या म्हणजे शिवराज चौहान सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा बळीही गेला होता. शेतकऱ्यांच्या नाराजीची किंमत भाजप सरकारला मोजावी लागली.

भोपाळ : मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी दोन तासाच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेन्शनही देण्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांवर कमलनाथ यांनी सवलतींचा वर्षावच केला आहे.  मध्यप्रदेश हे कृषिप्रधान राज्य आहे. यापूर्वीच्या म्हणजे शिवराज चौहान सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा बळीही गेला होता. शेतकऱ्यांच्या नाराजीची किंमत भाजप सरकारला मोजावी लागली. मागील सरकारचा विचार करता कमलनाथांनी शेतकऱ्यांना न दुखावण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

भाजप सरकार जाताच कॉंग्रेसचे सरकार आले. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्‍वासने पाळण्याचे ठरविलेले दिसते. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ एकच आठवड्यात शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचेही ठरविले आहे. ज्या शेतकऱ्यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत अशा दहा लाख शेतकऱ्यांना महिन्याला एक हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. पेन्शन देण्याचा त्यांचा हा निर्णय एैतिहासिक आहे. शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी अशी मागणी सातत्याने शेतकरी संघटना करीत आहेत. 

कलमनाथ यांनी कृषि खात्याला तशा सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना पेन्शन दिल्यास सरकारच्या तिजोरी बाराशे कोटींचा बोजा पडणार आहे. मध्यप्रदेश सरकार सरकारवर मोठा आर्थिक बोजा असला तरी शेतकऱ्यांना काही कमी पडू द्यायचे नाही. अधिकाऱ्यांनी आणि बॅंकानी यातून मार्ग काढण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान, कमलनाथांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. 

Web Title: madhya pradesh/bhopal farmers to get pension in mp


संबंधित बातम्या

Saam TV Live