पंतप्रधान बनण्याची राहुल गांधीची स्वत:चीच इच्छा नाही?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुका जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विजयरथाला धक्का देणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काही विरोधी पक्ष पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहू लागले आहेत. 'डीएमके'चे नेते एम. के. स्टॅलिन यांनी स्वत:हून पंतप्रधानपदासाठी गांधी यांचे नाव पुढे केल्यानंतर या चर्चेस उधाणच आले. मात्र, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा दावा खोडून काढला आहे. 

लोकसभा निवडणुकीला सहा महिनेच बाकी आहेत. त्यापूर्वी मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून राहुल यांची उमेदवारी जाहीर करावी, यासाठी इतर पक्षांमधील काही नेत्यांचा आग्रह आहे. पण खुद्द काँग्रेसमधूनच अद्याप यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. 

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत कमलनाथ म्हणाले, "राहुल यांची उमेदवारी जाहीर करण्याची काँग्रेसला कोणतीही घाई नाही. राहुल यांच्या उमेदवारीबाबत इतरांना कोणतीही अडचण किंवा हरकत नाही. पण खुद्द राहुल यांनीच कधीही पंतप्रधानपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितलेले नाही. निवडणुकपूर्व आघाडी करण्याआधी सर्व मित्रपक्षांशी यासंदर्भात चर्चा करून मगच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.'' 

'विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदासाठी कोण उमेदवार असेल', यासंदर्भात आताच भाष्य करणे चुकीचे असेल, असेही कमलनाथ म्हणाले. 'हा मुद्दा निवडणुकीनंतर उपस्थित होईल. सर्व मित्रपक्ष मिळून एका उमेदवाराचे नाव ठरवतील. आणखी एक किंवा दोन महिन्यांत सर्व चित्र स्पष्ट होईल', अशा शब्दांत कमलनाथ यांनी निवडणुकपूर्व आघाडीच्या प्रयत्नांना वेग येत असल्याचे संकेत दिले. 

Web Title: Rahul Gandhi never insisted on being PM, says Kamal Nath

संबंधित बातम्या

Saam TV Live