१६ लाखांहून अधिक एसटी प्रवासी स्मार्ट कार्डधारक 

१६ लाखांहून अधिक एसटी प्रवासी स्मार्ट कार्डधारक 

मुंबई : एसटीच्या ३१ विभागांतून एकूण ३ हजार ९२१ लाभार्थी प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढले आहे, तर २५० डेपोमधून महामंडळाच्या वतीने एकूण ५ लाख ५९ हजार ५६३ आणि खासगी संस्थेकडून ९ लाख ५२ हजार ५१८ प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढले आहेत. त्यामुळे राज्यभरातून एकूण १६ लाख ८३ हजार ४७१ स्मार्ट कार्ड काढले आहेत. यापैकी १५ लाख १२ हजार ८१ ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढले आहेत. एसटीच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल १६ लाखांहून अधिक प्रवासी स्मार्ट कार्डधारक झाले आहेत. यापैकी १५ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत.

३१ डिसेंबर, २०१९ अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून सर्व प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन रावते यांनी केले आहे.एसटीतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य केले आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी १ जानेवारी, २०२० पर्यंत मुदतवाढ दिले आहे, असे राज्याचे परिवहनमंत्री अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले आहे. 

 स्मार्ट कार्डच्या माध्यमातून खिशात रोख ठेवणे आवश्यक नाही. स्मार्ट कार्ड रिचार्ज करून प्रवाशांना सुलभरीत्या प्रवास करता येणार आहे.एसटी प्रवासात वाहक आणि प्रवासी यांचा सुट्या पैशांसाठी नेहमी वाद होत असे. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली. स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना एसटीतून प्रवास करता येणार असल्याने, काही दिवसात एसटीचे तिकीट हद्दपार होणार आहे.


Web Title:  Smart card holders become more than 3 lakh ST travelers in the state
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com