अंगारकी अन् नाताळमुळे आज वाहतूकीत असा बदल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे : अंगारकी संकष्टी चतुर्थी व नाताळानिमित्त आज (मंगळवार) शहराच्या मध्यवर्ती भागासह लष्कर परिसरामध्ये वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्त्यावर पीएमपीएल बस व मोठ्या वाहनांना मंगळवारी बंदी असून अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकादरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. याबरोबरच लष्कर परिसरातील काही रस्त्यांवरील वाहतुक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांच्या वाहतुक शाखेने केले आहे. 

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त वाहतुकीतील बदल :
- शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएल बस आणि मोठ्या वाहनांना मंगळवारी शिवाजी रस्त्यावर जाता येणार नाही. संबंधीत वाहनांनी स्वारगेटकडे जाण्यासाठी स.गो.बर्वे चौकातुन जंगली महाराज रस्त्याने डेक्कन, टिळक रस्ता मार्गे स्वारगेटला जावे. 

- आप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने सरळ गाडगीळ पुतळा चौकातुन पुढे जावे. 

नाताळानिमित्त लष्कर परीसरातील वाहतुकीमध्ये करण्यात आलेला बदल :

- गोळीबार मैदान चौकातुन महात्मा गांधी रस्ता व पुलगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाय जंक्‍शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना 15 ऑगस्ट चौक येथे बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी जवळील चौकाकडून वळविण्यात आली आहे. 

- ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. वाहनचालकांना एसबीआय हाऊस चौकातुन पुढे जाता येईल. 

- व्होल्गा चौकातुन महम्मद रफी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहतुक बंद असणार आहे. वाहतुक सरळ ईस्ट स्ट्रीट रस्त्याने इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात आली आहे. 

- इंदिरा गांधी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांना जाता येणार नाही. वाहनचालकांना इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलिस ठाणे मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. 

- सरबतवाला चौक ते महावीर चौक वाहतुक बंद ठेवण्यात आली असून वाहनांना ताबुत स्ट्रीट मार्गे पुढे जाता येईल. 
 
Web Title: today will be  Changes in the transport due angarak and Christmas

संबंधित बातम्या

Saam TV Live