कापसाला अच्छे दिन!

कापसाला  अच्छे दिन!

जळगाव - पावसाने यंदा जूनमध्ये उशिरा सुरवात केली असली तरी, नंतर पावसाने मधले अंतर (गॅप) भरून काढत एकूण सरासरीच्या ७० टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. खानदेशातील ‘पांढरे सोने’ म्हणून कापसाला प्राधान्य दिले जात असून, यंदा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भावानुसार यंदा कापसाला ५२०० पर्यंत भाव मिळेल, असे व्यापारी सांगत आहेत. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात सोळा लाख कापसाच्या गाठी तयार झाल्या होत्या. यंदा कापसाचे अधिक उत्पादन होणार असल्याने २० लाख गाठी तयार होतील, असे चित्र आहे.

खरिपात यंदा ५ लाख १ हजार ४३६ एवढा कपाशीचा पेरा झालेला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे कपाशीची स्थिती उत्तम आहे. दोन महिन्यांत बोंडे परिपक्व होऊन कापूस काढणीवर येईल. गतवर्षी कापसाला बाजारपेठेत ५५०० ते ५६०० पर्यंत भाव मिळाला. यंदा मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भावाचा विचार करता मागील वर्षीचा भाव व्यापाऱ्यांना देणे परवडणार नाही. त्यामुळे यंदा कापसाला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत भाव मिळेल, अशी आशा आहे.

Web Title: white cotton in jalgaon

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com