आता कम्प्युटरवरही सरकार ठेवणार 'वॉच'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : आत्तापर्यंत आपण आपल्या कम्प्युटरवर ज्या काही गोष्टी करत होतो. त्याची सहजपणे माहिती सरकारकडून घेण्यात येत नव्हती. मात्र, आता सरकारकडून याकडे लक्ष दिले जाणार आहे. कम्प्युटरवर कायद्याचे उल्लंघन केल्या जाणाऱ्या प्रत्येक घडामोडींकडे केंद्र सरकारची यापुढे नजर राहणार आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून देशातील दहा मोठ्या एजन्सींना आपल्या कम्प्युटरवर 'वॉच 'ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सरकारकडून या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याने कायद्याचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट होत असताना दिसल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी या दहा एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. या एजन्सीज् गुप्तहेरांसारखेच काम करणार आहे. त्यांच्यामार्फत केव्हाही ते आपल्या कम्प्युटर डाटा तपासण्याची त्यांना परवानगी असणार आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट आता कम्प्युटरवर करणे आता चांगलेच महागात पडणार आहे.

तसेच या एजेन्सीकडे आपल्या कम्प्युटरमध्ये कोणता आणि किती डाटा आहे, त्यावर आपण काय पाहतो, काय स्टोअर करतो याकडे लक्ष ठेवले जाणार आहे. या एजन्सीमध्ये सक्तवसुली संचनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), इन्टिलिजेन्स ब्युरो (आयबी) यांसारख्या असणार आहेत. 

या एजन्सी पाहू शकणार तुमच्या कम्प्युटरवरील डाटा  

- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो 
- सक्तवसुली संचनालय 
- सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स 
- डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स 
- रॉ 
- सीबीआय 
- आयबी 
- एनआयए 

 - दिल्ली पोलीस आयुक्त 
-डायरेक्टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजन्स (जम्मू-काश्मीर, उत्तर-पूर्व आणि आसामसाठी) 

Web Title: Your Computer Data On Agencies Watchlist Government Authorised 10 Agencies

संबंधित बातम्या

Saam TV Live