गावोगाव फिरून सरपटणाऱ्या 45 प्राण्यांचा अभ्यास!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

सोलापूर : वाळवी खाणारी पाल, सरगोटा सरडा, सापसुरळी, मृदुकाय साप, कृष्ण शीर्ष साप, पोवळा साप, वोल्सचा मण्यार यासह सोलापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या 45 सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास बार्शीचे प्रा. प्रतीक तलवाड यांनी केला असून सोलापूर विद्यापीठाची पीएचडी मिळविली आहे. विविध गावे, शहरांत जाऊन त्यांनी सरपटणाऱ्या प्राण्यांमधील विविधता, अन्नसाखळीतील त्यांचा सहभाग आणि संवर्धनासाठी करावे लागणारे प्रयत्न याची मांडणी केली आहे.

सोलापूर : वाळवी खाणारी पाल, सरगोटा सरडा, सापसुरळी, मृदुकाय साप, कृष्ण शीर्ष साप, पोवळा साप, वोल्सचा मण्यार यासह सोलापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या 45 सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास बार्शीचे प्रा. प्रतीक तलवाड यांनी केला असून सोलापूर विद्यापीठाची पीएचडी मिळविली आहे. विविध गावे, शहरांत जाऊन त्यांनी सरपटणाऱ्या प्राण्यांमधील विविधता, अन्नसाखळीतील त्यांचा सहभाग आणि संवर्धनासाठी करावे लागणारे प्रयत्न याची मांडणी केली आहे.

प्रा. तलवाड यांनी सोलापूर जिल्ह्यात 2014 ते 2017 या कार्यकाळात केलेल्या अभ्यासात पाली, सरडे, सापसुरळ्या, साप तसेच कासवांचा समावेश आहे. त्यांनी विविध परिसंस्थांचा तसेच अधिवासाचा अभ्यास करून माहिती संकलित केली आहे. जिल्ह्यातील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक जातींना असणारे धोकेसुद्धा अभ्यासण्यात आले. विविध कारणांमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची कमी होत जाणारी संख्या तसेच यावरील उपायसुद्धा या अभ्यासात आहेत. माणसाकडून भीतीपोटी मारल्या जाणाऱ्या सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच रस्त्यांवर वाहनांखाली चिरडून सरपटणाऱ्या प्राण्यांचे होणारे मृत्यू याचेही प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासात दिसले आहे. 

"सोलापूर जिल्ह्यातून दोन नवीन जातींचे साप, एका जातीची पाल व सरडे यांच्या काही नवीन जाती शोधण्याचे काम सुरू आहे. या अभ्यासाचा उपयोग आपल्या भागातील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जाती-उपजातीच्या संवर्धनासाठी काही पॉलिसी बनविण्यासाठी करता येऊ शकेल. जगाच्या पाठीवर सर्वत्र सरपटणारे प्राणी आढळतात. त्यांचे संरक्षण झाल्यास परिसंस्था तसेच वन्यजीवांना वाचवण्यात आपणास मदत होऊ शकेल,' असे प्रा. तलवाड यांनी सांगितले. 

प्रा. तलवाड यांनी बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य (स्व.) डॉ. मधुकर फरताडे, वालचंद कॉलेज येथील प्राणिशास्त्राचे डॉ. के. आर. राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास पूर्ण केला आहे. अभ्यासाकरिता नेचर कॉन्झर्वेशन सर्कल तसेच अन्य वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

कोणत्याही प्राण्याचा शास्त्रीय अभ्यास झाल्यास पुढे त्या प्राण्याचे संवर्धन करणे हे सोपे होते. यापूर्वी वाघांचा संपूर्ण अभ्यास झाल्यामुळेच आज त्यांना वाचविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सरपटणारे प्राणी हे अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळे यांचा भाग आहेत. त्यांची संख्या कमी अथवा जास्त झाल्यास नक्कीच अन्नसाखळीवर परिणाम होऊन शेवटी मानवी जीवनावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतील. 
- प्रा. डॉ. प्रतीक तलवाड, बार्शी 

सहापैकी तीन जाती सोलापूर जिल्ह्यातील 
2016ला बंगळुरू येथील काही शास्त्रज्ञांनी सरगोटा म्हणजेच फॅन थ्रोटेड लिझर्ड या सरड्याच्या भारतात सहा जाती शोधल्या. तो अभ्यास पूर्ण करण्यासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्याची मदत झाली. तसेच सहापैकी तीन जाती आपल्या जिल्ह्यात आढळत असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. हा अभ्यास प्राण्यांच्या बाह्य शरीर रचनेवरून करण्यात आला. परंतु आता जेनेटिक्‍स यासारख्या विषयांत अधिकचा अभ्यास झाल्याने डीएनएचा अभ्यास करून नवनवीन जाती शोधण्यात शास्त्रज्ञांना यश येत आहे.

Web Title: youth observe animals in Solapur


संबंधित बातम्या

Saam TV Live