'आ गई बदलाव की आँधी, राहुल संग प्रियांका गांधी'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

लखनौ : काँग्रेसमधील नवे सत्ताकेंद्र असलेल्या प्रियांका गांधी आज (सोमवार) लखनौ दौऱ्यावर येत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह त्यांचा 15 किलोमीटरचा रोड शो होणार आहे. यानिमित्त लखनौमध्ये पोस्टर्स झळकले असून, आ गई बदलाव की आँधी, राहुल संग प्रियांका गांधी असे मजकूर असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

प्रियांका गांधी यांनी नुकतीच काँग्रेस मुख्यालयामध्ये सरचिटणीसपदाची औपचारिक जबाबदारी स्वीकारली होती. कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्तर प्रदेशात कामाला लागण्याचा संदेश त्यांनी दिला होता. तसेच त्यांनी रविवारी एक ऑडिओ मॅसेज पाठवून नव्या राजकारणाला सुरवात करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला होता. प्रियांकांकडे पूर्व उत्तर प्रदेशातील 43 जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

प्रियांका गांधी आज राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह लखनौमध्ये 15 किमीचा रोड शो करणार आहेत. त्यानंतर चार दिवस त्यांचा मुक्काम येथेच असणार आहे. त्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यानिमित्त काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून, लखनौमधील काँग्रेस मुख्यालय झळाळून निघाले आहे.

Web Title: Priyanka Gandhi in Lucknow accompanied by Rahul Gandhi, Jyotiraditya Scindia

संबंधित बातम्या

Saam TV Live