पर्यटनवाढीसाठी राज्यात आता ‘जेलयात्रा’, 26 जानेवारीपासून राज्यात तुम्ही करु शकता जेल टुरिझम

साम टीव्ही
शनिवार, 23 जानेवारी 2021

येत्या 26 जानेवारीपासून येरवडा जेलची कवाडं पर्यटकांसाठी खुली होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते जेल टुरिझमचं उद्घाटन पार पडणारंय. 

राज्यातील कारागृहे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या घटनांचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जतन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये जेल टुरिझमची संकल्पना राबवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली.

हेही वाचा -

Petrol-diesel price hike | पेट्रोल डिझेलच्य़ा किंमती पुन्हा वाढल्या, वाचता कसे असतील नवे दर?

येत्या 26 जानेवारीपासून येरवडा जेलची कवाडं पर्यटकांसाठी खुली होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते जेल टुरिझमचं उद्घाटन पार पडणारंय. सर्वप्रथम पुण्यात ही योजना राबवल्यानंतर, नाशिक रोड आणि ठाणे कारागृहात संकल्पना राबविण्यात येणार आहे.

पाहा गृहमंत्री अनिल देशमुखांची जेल पर्यटनाबाबत सविस्तर माहिती-


संबंधित बातम्या

Saam TV Live