नंदुरबारमध्ये आमदारांकडून कोरोना उपाययोजनांसाठी निधीचा आखडता हात!

Money
Money

नंदुरबार : गेल्या वर्षभरापासून नंदुरबार Nandurbar जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर Corona कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार आमदारांना MLA प्राप्त झालेल्या निधीतून प्रत्येकी 50 लाख रुपये खर्च करणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यातील चार आमदारांकडून एकत्रित 1 कोटी 65 लाखांचा निधी कोरोना साठी खर्च झालेला आहे. 1 crore 65 lakh spent for corona from four MLAs in the nandurbar district

त्यापैकी तळोदा शहादा Shahada चे आमदार राजेश पाडवी Rajesh Padvi यांनी स्वतः ग्राउंड वर जाऊन विविध उपाययोजना करत 50 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. तर अक्राणी Akrani मतदार संघाचे आमदार के सी पाडवी CK Padavi यांनीदेखील 49 लाख 88 हजारांचा निधी खर्च केला आहे.

नंदुरबार मतदार संघाचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित Vijay kumar Gavit यांनी 40 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे तर सर्वात कमी आमदार निधी खर्च करणारे  नवापूर Navapur विधानसभेचे आमदार शिरीष कुमार नाईक Shirish Kumar Naik आहेत.

खरंतर नवापूर तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना चा उद्रेक झाल्याने नागरिकांना चार महिने त्रास सहन करावा लागला होता. यावर उपाययोजनांसाठी निधी असतानादेखील नवापुरचे आमदार उपाययोजना करण्यात असमर्थ ठरले आहे. हे नवापूर मतदारांचे दुर्दैव आहे.

नवीन वर्षासाठी चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही आमदाराने अद्याप पर्यंत आपापल्या मतदार संघात उपाययोजनांसाठी प्रस्ताव दिलेले नाही. नागरिकांचा पैसा शासनाच्या माध्यमातून आमदारांना निधी म्हणून दिला जातो. तो देखील खर्च करण्याकडे हात आखडता घेणाऱ्या आमदारांना घरून पैसे टाकावे लागतात की काय असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेने उपस्थित केला आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com