धुळे जिल्ह्यात केमिकल कंपनीत स्फोट,10 जणांचा मृत्यू 50 जण अडकल्याची भीती

धुळे जिल्ह्यात केमिकल कंपनीत स्फोट,10 जणांचा मृत्यू 50 जण अडकल्याची भीती


धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथे आज (शनिवार) सकाळी केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील एका केमिकल कंपनीत आज सकाळी एकामागून एक स्फोट झाले. त्यामुळे कंपनीत काम करत असलेल्या 10 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर  या स्फोटात  50 जण  जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. स्फोट नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.


Web Title: 10 dead in blast at chemical company in Dhule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com