कोव्हिशील्डचे 10 लाख डोस परत पाठवणार

साम टीव्ही
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर उपचार करत नसल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेने केलाय. महत्त्वाचं म्हणजे, कोव्हिशील्डचे 10 लाख डोस परत पाठवण्याबाबतचं पत्रही सीरम इन्स्टिट्यूटला देण्यात आलंय.

सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड ही लस प्रत्येकासाठी मोठं वरदान ठरलीय. मात्र, ती कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर उपचार करत नसल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेने केलाय. महत्त्वाचं म्हणजे, कोव्हिशील्डचे 10 लाख डोस परत पाठवण्याबाबतचं पत्रही सीरम इन्स्टिट्यूटला देण्यात आलंय.

 सकोरोनाच्या संकटात सापडलेल्या प्रत्येकाला लशीची प्रतीक्षा होती, अनेक देशांमध्ये अनेक कंपन्यांच्या लस आल्याही. भारतातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लशीनेही भारतासह जगभराला मोठा दिलासा दिलेला असतानाच, आता कोव्हिशील्ड कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर परिणामकरक नसल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेने केलाय.

दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर कोव्हिशील्ड निष्प्रभ असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळेच, दक्षिण आफ्रिकेने कोव्हिशील्ड लशीचे १० लाख डोस परत पाठण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिकेने तसं पत्र पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला दिलंय. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशील्ड लशीच्या आपत्कालीन वापरास जगातील देशांना परवानगी दिलीय.
 

सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड ही लस प्रत्येकासाठी मोठं वरदान ठरलीय. मात्र, ती कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर उपचार करत नसल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेने केलाय. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आणि नव्या कोरोनाचे रूग्ण भारतात सापडत असताना ही चिंताजनक बाब असल्याचे बोललं जातंय. अर्थात, याबाबत सीरम इन्स्टिट्यूट संशोधन करून, काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live