भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा 10 चौक्या

साम टीव्ही
शुक्रवार, 12 जून 2020
  • पाकिस्तानला भरली धडकी
  • भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केल्या 10 चौक्या
  • वर्षभरात 100 दहशतवाद्यांचा खात्मा
     

वारंवार आगळीक करणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्यासाठी भारतानं कंबर कसलीय. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या 10 चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत तर वर्षभरात 100 दहशतवादी ठार झाले आहेत. 

एकीकडे देशावर कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती आहे. मात्र यावेळी भारतानं पाकला चांगलीच धडकी भरवलीय. भारतीय सैन्यदलानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचा ढळढळीत पुरावा. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. राजौरी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केलीह. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या 10 चौक्या उद्ध्वस्त केल्या आहे.या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झालंय. 

 दुसरीकडे भारतीय सैन्यदलानं दहशतवाद्यांविरोधात देखील जोरदार मोहीम उघडलीय. काश्मीर खोऱ्यात गेल्या वर्षभरात तब्बल 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. 

2016 मध्ये जम्मू काश्मीर भागात 77 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला . 2017 मध्ये 90 तर 2018 मध्ये 108 दहशतवादी ठार झाले. 2019 मध्ये हा आकडा 128 इतका होता तर 2020 च्या मध्यापर्यंत जवळपास 102 दहशतवादी मारले गेले आहेत. 

फायनल व्हीओ - पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत. तरीही पाकनं धडा घेतलेला दिसून येत नाही. सीमेवर पाकच्या कुरापती सुरूच आहे. पाकच्या 10 चौक्या उध्वस्त करून भारतीय सैन्यानं पाकला चांगलीच अद्दल घडवलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live