100 कोटींची गुपीतं उलगडणार,एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी

साम टीव्ही
बुधवार, 24 मार्च 2021

एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी
100 कोटींची गुपीतं उलगडणार ?
डायरीत अनेक व्यवहारांच्या नोंदी

 

API सचिन वाझे यांची एक डायरी NIA च्या पथकाच्या हाती लागलीय. या डायरीतून अनेक मोठ्या व्यवहारांची पोलखोल होणारेय.

सचिन वाझेच्या कार्यालयाच्या झडतीदरम्यान NIA च्या हाती एक डायरी लागलीय. या डायरीमुळे अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणारेय.  

10 वर्षांत पाण्याची भीषण टंचाई,पाणी मिळणार रेशनिंगवर?

वाझेच्या अटकेनंतर NIA च्या अधिकाऱ्यांनी 16 मार्चला CIU कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी त्यांना तिथे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि काही कागदपत्रं मिळाली होती. शिवाय एक डायरीही या पथकाच्या हाती लागली. ज्यामध्ये पैशाच्या व्यवहाराबद्दलच्या अनेक नोंदी आहेत. शिवाय काही सांकेतिक नोंदीही करण्यात आल्यात. बार, रेस्टॉरंट्स आणि इतर गोष्टींमधून गोळा झालेल्या पैशांच्या व्यवहाराची ही डायरी असू शकते, असं तपास यंत्रणांचं मत आहे.

सध्या या डायरीची तपासणी अगदी प्राथमिक टप्प्यात आहे. मात्र यातील पैशाच्या व्यवहारांचा माग काढण्यासाठी एनआयए ईडीची मदत घेण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे लवकरच या डायरीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. साम टीव्ही 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live