दहावीचा निकाल १५ जुलैनंतर लागण्याची शक्यता; स्वरूप दोन दिवसांनी स्पष्ट होणार

अश्विनी जाधव - केदारी
सोमवार, 7 जून 2021

मूल्यमापन पद्धतीनुसार इयत्ता दहावीचा निकाल तयार केला जाणार आहे. परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठीचा संबंधित आराखडा आज किंवा उद्या प्रसिद्ध केला जाणार आहे. 

मुंबई : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 10th Exams रद्द केल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. दहावीची परीक्षा महाराष्ट्र सरकणारे State Government रद्द केल्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. परंतु, शाळेची टक्‍केवारी वाढावी, आपल्या स्पर्धेतील शाळांच्या तुलनेत आपली पटसंख्या कमी होऊ नये, याची खबरदारी घेत बहुतेक शाळांनी विद्यार्थ्यांना संपर्क केला, आता बोर्डाच्या परीक्षेपूर्वी झालेल्या पूर्व परीक्षेत नापास त्यांची पुन्हा पूर्व परीक्षा घेणे सुरू केले आहे. 10th standard results are likely to be declare after July 15

देवो के देव...फेम मोहित रैनाची चौघांविरोधात पोलिसांत तक्रार

मूल्यमापन Evaluation पद्धतीनुसार इयत्ता दहावीचा निकाल तयार केला जाणार आहे. परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठीचा संबंधित आराखडा Outline आज किंवा उद्या प्रसिद्ध केला जाणार आहे. मात्र, १५ जुलैपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्य मंडळ State Board दहावीचा निकाल नववी आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण शाळांकडून मागवले जाणार आहेत. त्यासाठी शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन Online format पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ State Board of Secondary and Higher Secondary Education अध्यक्ष दिनकर पाटील यांनी माहिती दिली आहे.  दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा सोमवारी किंवा मंगळवारी प्रसिद्ध केला जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी विद्यार्थ्यांचे गुण या  आराखड्यामध्ये  भरायचे आहेत. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा दिनकर पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live